शिवसेना प्रणीत माथाडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष जगदीश कुडेकरांवर गोळीबार

0
537

मुंबई, दि. २ (पीसीबी) – शिवसेना प्रणीत माथाडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष जगदीश कुडेकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांकडून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज (मंगळवार) सकाळी सव्वादहाच्या सुमारास बदलापूरच्या सानेवाडीत घडली.

हल्लेकोरांचे पिस्तुल लॉक झाल्याने कुडेकर थोडक्यात बचावले. हल्लेखोरांनी सुरुवातील हवेत गोळी चालविली होती.या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सव्वादहाच्या सुमारास बदलापूरच्या सानेवाडीत कुडेकर यांना मारण्यासाठी दोन हल्लेखोर दुचाकीवरून आले होते. त्यांनी कुडेकर यांच्यावर गोळीबार करण्यापूर्वी हवेत गोळी चालविली. नंतर कुडेकर यांच्यावर पिस्तुल रोखताच ते लॉक झाले. त्यामुळे कुडेकर थोडक्यात बचावले. हल्लेखोर नेमके कोण होते, हे कोणाच्या सांगण्यावरून ते कुडेकर यांना मारण्यासाठी आले होते, याचा पोलिस शोध घेत आहेत.