पिंपळेसौदागरमध्ये गांधी जयंतीनिमित्त महिलांना रेड डॉट स्टीकरचे वाटप

0
442

चिंचवड, दि. २ (पीसीबी) – रोझलॅड रेसिडेन्सी सोसायटी, नाना काटे सोशल फाउंडेशन आणि नगरसेविका शितल काटे  यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी जयंतीच्यानिमित्ताने पिंपळेसौदागर येथील रोझलॅड रेसिडेन्सी सोसायटी येथे आज (मंगळवारी) रेड डॉट कॅम्पैन मोहीमचे आयोजन करण्यात आले. यावेळी महिलांना रेड डॉट स्टीकरचे वाटप करण्यात आले.

यावेळी रहाटणी, पिंपळेसौदागर परिसरातील विविध सोसायटीचेचे अरमन, पदाधिकारी, सभासद, आणि नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये प्रथमच राबवण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे रहाटणी, पिंपळेसौदागर परिसरातील नागरिकांकडून स्वागत करण्यात आले.

दरम्यान, रेड डॉट कॅम्पैन ही संकल्पना रहाटणी, पिंपळेसौदागर परिसरातच नव्हे तर ती संपूर्ण चिंचवड मतदार संघामध्ये राबवली जावे, असे आव्हान यावेळी नगरसेविका शीतल काटे यांनी नागरिकांना केले. यावेळी मुंबई आय आय टीच्या प्राध्यापिका रजजी अजवाणी यांनी नागरिकांना संबोधताना रेड डॉट मुळेचे फायदे सांगितले.