मोदींची गाडी पंक्चर झाली आहे, इंजिनही बिघडलं; राहुल गांधींचा घणाघात

0
357

वर्धा, दि. २ (पीसीबी) – मोदी चौकीदार नाही, तर ‘राफेल’मध्ये भागीदार आहेत, अशी टीका करून  ‘राफेल विमानांची किंमत६०० कोटींवरुन १६०० कोटींवर कशी गेली? मोदीजी, तुमचे मित्र अनिल अंबानीजी आहेत, ज्यांना तुम्ही राफेल विमानांचा करार दिला आहात, ज्यांच्या खिशात तुम्ही आपल्या देशातील माताभगिनींच्या खिशातील ३० हजार कोटी घातले, त्या अंबानींनी उभ्या आयुष्यात एकही विमान बनवले नाही,  असे शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांच्यावर घणाघात केला .  

वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमात काँग्रेस कार्यकारिणीची आज बैठक सुरू झाली. यावेळी   राहुल गांधी बोलत होते. ते म्हणाले की, मोदींची गाडी पंक्चर झाली आहे, इंजिनही बिघडलं, आता काँग्रेसवर विश्वास ठेवा, असे आवाहन  त्यांनी केले.

मोदी म्हणाले होते की, मी पंतप्रधान होण्यापूर्वी हत्ती झोपलेला होता. भारत निद्रावस्थेत होता. हे भारताच्या पंतप्रधानांचे शब्द आहेत.  त्यांनी देशाचा अपमान केला. गांधीजींचा अपमान केला. देशाच्या जनतेचा अपमान केला. गांधीजी म्हणाले होते देशाला जोडायचे आहे, तर  मोदी म्हणतात देशाला तोडायचे आहे’ अशी टीकाही राहुल गांधींनी यावेळी केली.

मोदींनी प्रत्येक खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले? दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले, असा सवाल त्यांनी मोदींना केला.
लोकसभेत चार प्रश्न विचारले. माझे डोळे बघा. मी डोळ्यात डोळे घालून बोलत आहे. मी मीडियाच्या कॅमेरात डोळे घालून बोलत आहे. कारण मी खरे बोलत आहे. पण मला उत्तर देताना पंतप्रधान इकडे तिकडे बघत होते. कधीच देशाच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकले नाहीत, असेही राहुल गांधी म्हणाले.