शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा सेनेच्या 100 पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

0
88
  • काळेवाडीत युवा सेनेच्या मेळाव्यात नियुक्तीपत्र वाटप

पिंपरी, दि. 8 (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवा सेनेच्या पदाधिका-यांचा मेळावा काळेवाडीतील इंदू लॉन्स येथे संपन्न झाला. यावेळी युवासेनेची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. तसेच युवासेनेच्या पिंपरी व चिंचवड विधानसभेतील विविध पदावर 100 पदाधिकाऱ्यांना युवासेना शहर प्रमुख चेतन (अण्णा) पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मावळ लोकसभा मतदार संघाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील, जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, राज्याच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ, शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे, प्रचार प्रमुख योगेश बाबर, शहर संघटीका अनिता तुतारे, उप संघटीका वैशाली मराठे, युवा सेनेचे चिंचवड विधानसभा प्रमुख विशाल नाचपल्ले, पिंपरी विधानसभा प्रमुख शुभम मुळे, दस्तगीर मणियार, मायाताई जाधव यांच्यासह शहरातील युवासेनेचे प्रमुख पदाधिकारी, उपशहर प्रमुख, उपजिल्हाप्रमुख, विधानसभाप्रमुख, विधानसभा उपप्रमुख, तसेच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिंपरी व‌ चिंचवड विधानसभेतील युवा सेनेच्या पदाधिका-यांची नियुक्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले. यामध्ये चिंचवड विधानसभा चिटणीस अमेय बारटक्के, समन्वयक शिवाजी चव्हाण, सुमित चव्हाण, मयूर खाडे, प्रणव वाडेकर, विभाग संघटक सांगवी नितीन भिंगारे, चिंचवड विधानसभा उप अधिकारी सुधीर कुंभार, चिंचवड विधानसभा उप अधिकारी गणेश भोसले, चिंचवड विधानसभा चिटणीस अनिकेत डेरवणकर, चिंचवड विधानसभा सोशल मीडिया अधिकारी रामचंद्र पाडुळे, चिंचवड विधानसभा समन्वयक कृष्णा ढवरे,

सांगवी प्रभागातील प्रभाग प्रमुख सागर चिंतामणी, उपविभाग प्रमुख तुलसीदास केवतकर, वीरेंद्र मानकर, सोशल मीडिया प्रमुख प्रणव वाडेकर, शाखा अधिकारी राजू लोंडके, काळेवाडीतील प्रभाग प्रमुख शुभम पांचाळ, उपविभाग प्रमुख अक्षय सरवदे, ऋषभ पिल्ले, सोशल मीडिया प्रमुख सौरभ इंगवले, शाखा अधिकारी हर्षल गाढवे, युवती प्रमुख श्रेया देवकर,

राहणीतील प्रभाग प्रमुख प्रफुल काविष्ठे, उपविभाग प्रमुख राकेश जोशी, आकाश जाधव, सोशल मीडिया प्रमुख निलेश फुलसौंदर, शाखा अधिकारी संतोष सकपाळ, पिंपळे गुरव येथील प्रभाग प्रमुख आशिष जोशी, उपविभाग प्रमुख निरंजन जगताप, सोशल मीडिया प्रमुख ओंकार गुमास्ते, शाखा अधिकारी गौरव कुलकर्णी, वालेकरवाडी बिजीलीनगर येथील प्रभाग प्रमुख ज्ञानेश्वर वायकुळे, उपविभाग प्रमुख परशुराम कापरे, सलीम शेख, सोशल मीडिया प्रमुख मल्लिकार्जुन उकले, शाखा अधिकारी अजित शेंडगे,

ताथवडे पुनावळे येथील उपविभाग प्रमुख मनोज मिटकरी, प्रदीप जाधव, सोशल मीडिया प्रमुख कार्तिकेश एडके, शाखा अधिकारी विकी चव्हाण, युवती प्रमुख ज्योती पाटोळे यांना, तसेच पिंपरी विधानसभेतील पदाधिकारी, सांगवी, काळेवाडी, रहाटणी, श्रीनगर, पिंपळे गुरव, बिजलीनगर, वाल्हेकरवाडी, ताथवडे, पुनावळे येथील युवसेनेच्या पदाधिकार्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

महाराष्ट्रात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेनेचे संघठन मजबूत केले जात आहे. तरुणांना युवासेनेशी जोडले जात आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे काम पाहून युवक युवासेनेत मोठ्या संखेने येत आहेत. युवासेनेची पुढील वाटचाल, नवनियुक्त झालेल्या कार्यकारणी पदाधिकार्यांच्या जबाबदाऱ्या, पक्ष संघटन आणि पक्षाची वाटचाल आदींबाबत आयोजित मेळाव्यात मार्गदर्शन मान्यवरांच्या वतीने करण्यात आले. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या कामावर विश्वास ठेऊन युवकांनी एकत्र येऊन युवासेना बळकट करावी. तसेच युवसेनेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा सेनेचे शहरप्रमुख चेतन (अण्णा) पवार यांनी केले आहे.