शाहीन बाग आंदोलनादरम्यान जडला जीव; दोन जोड्या अडकणार लग्नबंधनात

0
393

दिल्ली, दि.७ (पीसीबी) – नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (सीएए) दिल्लीतील शाहीन बागमध्ये गेल्या दिड महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात तरूणवर्गाचा अधिक सहभाग असल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान, शाहीन बाग तरुण-तरुणींसाठी प्रेम फुलण्याचे स्थळही बनल्याचे चित्र आहे.

आंदोलनादरम्यान प्रेमाची दोन नाती जुळली आहेत. यामधील एका जोडीचे लग्न ७ फेब्रुवारीला होत असून दुसरी जोडी ८ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही जोड्यांचे कुटुंब एकमेकांना ओळखतात. आंदोलनादरम्यान लग्नाची बोलणी झाली. जुनैद आणि समर हे दोघे मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेतात. आंदोलनावेळी दोघांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. यासंदर्भात दोघांनी घरच्यांना माहिती दिली. दोघांच्याही घरच्यांना हे नाते मान्य असून या जुनैद आणि समर हे दोघे ७ फेब्रुवारीला साता जन्माच्या गाठी बांधणार आहेत.