भाजपला मिशन कमळ करु द्या, आमच्याकडे धनुष्यबाण’ – भुजबळ

0
385

मुंबई, दि.७ (पीसीबी) –  भाजपच्या या ‘ऑपरेशन लोटस’ वर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी जोरदार टीका केली आहे. भाजपला मिशन कमळ करु द्या, आमच्याकडे धनुष्यबाण’ आहे. किती वेळा बाण सोडावेत यासाठी घड्याळ आणि मजबूत हात देखील आहेत अशी टीका भुजबळ यांनी केली आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षांनी मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. राज्यातल्या महाविकास आघाडीला सत्तेवर येऊन आता तीन महिने होत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या या महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षांची विचारसरणी वेगळी आहे. या वेगवेळ्या विचारसरानीचे पक्ष सत्तेत आल्याने अगदी पहिल्या दिवसांपासूनच या पक्षांमध्ये कुरबुरी, आणि अंतर्गत कलह सुरू असल्याचे पुढे आलंय. त्याचाच फायदा घेत भाजप ठाकरे सरकारविरुद्ध व्ह्युरचना आखत असून राज्य सरकारला धक्का देण्यासाठी तयारी करत आहेत. सध्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांच्या प्रचारसभेत भाजपचे हायकमांड पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व्यस्त आहेत. त्यामुळे दिल्ली निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा ‘ऑपरेशन लोटस’ सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पाहितीमुळे महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे.