शरद पवारांच्या भेटीनंतर राज ठाकरे विधानसभा लढवणार ?  

0
503

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात रान पेटवणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत अद्याप कोणतीही    भूमिका स्पष्ट केलेली नाही.  या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राज ठाकरे यांची भेट घेऊन  चर्चा करणार आहेत.

राज ठाकरे यांची अंमलबजावणी संचलनालयाने  (ईडी) तब्बल  साडेआठ तास चौकशी केली.  या चौकशीनंतर  राज यांनी कोणतेही राजकीय विधान केलेले नाही. दरम्यान, मनसेची विधानसभेच्या संदर्भात एक बैठक झाली.  या बैठकीत  राज ठाकरे यांनी  विधानसभा न लढवण्याची भूमिका घेतल्याची   माहिती समोर आली होती.  आर्थिक मंदीमुळे निवडणूक लढवणे कठीण असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते.

या पार्श्वभूमीवर शरद पवार राज यांच्याशी चर्चा करून त्यांनी निवडणूक लढविण्यास राजी करण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी भाजप, शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे आघाडीची अवस्था गलितगात्र झाली आहे. अशा परिस्थिती विरोधकांची बाजू भक्कम करण्यासाठी शरद पवार राज यांना सोबतीला घेतली, अशी शक्यता वर्तवली जात आहे.