शतपावली करण्यासाठी गेलेल्या वृध्द महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी केले लंपास

0
755

हिंजवडी, दि. २९ (पीसीबी) – पतीसोबत शतपावली करण्यासाठी गेलेल्या एका वृध्द महिलेच्या गळ्यातील १ लाख २० हजार रुपये किमतीची सोन्याचे चेन आणि मंगळसूत्र दुचाकीवरील दोघा चोरट्यांनी हिसका मारुन चोरुन नेले. ही घटना बुधवारी (दि.२८) सायंकाळी साडेसातच्या सुमारास बावधन येथील युनिकस सोसायटी समोरील एलएमडी चौकात घडली.

याप्रकरणी सरिता दत्तात्रय कुलकर्णी (वय ६०, रा. कंम्बाईन स्प्लेंडर बिल्डिंग, डी/३०३, एलएमडी गार्डनजवळ, बावधन) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दुचाकीवरील अज्ञात दोघा चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास फिर्यादी सरिता या त्यांच्या पतीसोबत बावधन येथील युनिकस सोसायटी समोरील एलएमडी चौकातून शतपावलीसाठी निघाल्या होत्या. यावेळी एका दुचाकीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी सरिता यांच्या गळ्यातील १ लाख २० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन आणि मंगळसूत्र जबरदस्तीने हिसका मारुन चोरुन नेले. ते चोरटे इतक्यावरच थांबले नाही त्यांनी पुढे जाऊन बावधन स्मशानभूमी जवळ देखील एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरुन नेले. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वार चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे.