व्याजाने दिलेले पैसे परत मागीतल्याच्या कारणावरुन चऱ्होलीतील त्या महिलेचा खून; दोघांना अटक

0
615

भोसरी, दि. २० (पीसीबी) – व्याजाने दिलेले पैसे परत मागीतल्याच्या कारणावरुन दोघाजणांनी मिळून चऱ्होलीतील शेतात सुनंदा वाळके (वय ५८) या महिलेच्या डोक्यात दगड मारुण तसेच चाकूने वार करुन खुन केल्याचे निष्पन्न झाले आहे. ही घटना शनिवारी (दि. १६) चऱ्होली बुद्रुक येथील शेतात घडली होती.