विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देणार नाही – राधाकृष्ण विखे-पाटील

0
505

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – मी विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा देणार नाही, पक्षांकडून जी भूमिका घेण्यात येईल, ती मला मान्य असेल, असे पुत्र सुजय विखेंच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेस नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते  राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज (मंगळवार)  म्हटले आहे.

पक्ष जी जबाबदारी देईल, ती मी पार पाडेन, असेही विखे पाटील यांनी म्हटले आहे.  सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर विखे पाटील विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा देणार का?  अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. परंतु खुद्द राधाकृष्ण विखे-पाटील यांनी  चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पूत्र सुजय विखे-पाटील यांनी आज (मंगळवार)  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन  आदी नेते उपस्थित होते.