भाजप प्रवेशानंतर सुजय यांचे लोकसभेचे तिकीट निश्चित; मुख्यमंत्र्यांचे सुतोवाच    

0
747

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – अहमदनगरचे युवा नेते सुजय विखे-पाटील यांचे लोकसभेचे तिकीट निश्चित आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (मंगळवार) सुजय यांच्या भाजपप्रवेशानंतर   म्हटले आहे. सुजय यांचे नाव लवकरच भाजपच्या संसदीय समितीकडे पाठवण्यात येणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. 

काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पूत्र सुजय विखे –पाटील यांनी आज  भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सुजय यांच्या नगर मधून  सुजय यांना  उमेदवारी देण्याबद्दल जाहीर भाष्य केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, सुजय यांच्या रूपाने एक उमदा तरुण भाजपमध्ये येत आहे. राजकारणात दमदार पाऊल टाकत असताना कुणासोबत टाकावे, ते सुजयना नेमके समजले आहे. मी त्यांच्याशी चर्चा करून सगळे आमदार व कार्यकर्त्यांशी चर्चा केली.  सुजय यांच्या प्रवेशामुळे नगर जिल्हा भाजपचा बालेकिल्ला होईल, असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.