विधानसभा निवडणूक; काँग्रेसने मागविले इच्छुक उमेदवारांकडून अर्ज

0
390

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर  आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या  पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ६ जुलैपर्यंत  पाठवा, असे आवाहन  काँग्रेस पक्षाने  केले आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  अशोक चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी नियोजनाला सुरूवात केली आहे. विविध पातळ्यांवर तयारी सुरू करण्यात येत आहे. चव्हाण यांनी नियमितपणे विविध पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन नियोजनाचा आणि पूर्वतयारीचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे.

प्रदेश काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे लेखी अर्ज मागवले आहेत. इच्छुकांनी आपले अर्ज ६ जुलै २०१९ पर्यंत  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर पश्चिम, मुंबई येथे पाठवण्याचे आवाहन करण्यात आले  आहे.