बुलडाण्यात मुलगी पाहण्यासाठी गेलेल्या चौघांचा भीषण अपघातात मृत्यू

0
452

बुलडाणा, दि. २३ (पीसीबी) – मुलाला मुलगी पाहण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघे आणि कारचालक अशा चौघा जणांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना शनिवारी (दि.२२) रात्री एकच्या सुमारास औरंगाबाद महामार्गावर असलेल्या मेहकर तालुक्यातील अंजनी फाट्यावर घडली.

मनोहर क्षिरसागर (वय ७०), मेघा मनोहर क्षिरसागर (वय ३५), नलीनी मनोहर क्षिरसागर (वय ६६) आणि बोलेरो चालक सुगदेव नागरे (वय २५) असे मृत चौघाजणांची नावे आहेत. हे सर्व औरंगाबादचे रहिवासी आहेत. अपघात एवढा भीषण होता की मृतकाना जेसीबी मशीनच्या साहाय्याने बाहेर काढावे लागले.

प्राप्त माहितीनुसार, क्षीरसागर कुटुंब हे वाशीमला त्यांच्या मुलासाठी मुलगी पहायला बोलेरो कारने गेलेची माहिती मिळत असून परत येताना त्यांच्या कारला सिमेंटच्या कंटेनरने जोरदार धडक दिली. यामध्ये कारचालक आणि क्षिरसागर कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यानंतर, मृतांना जवळील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पार्थिव मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात हे मृतदेह ठेवण्यात आलेले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. विशेष म्हणजे महिन्यांपूर्वी याच ठिकाणी अपघात होऊन ५ जणांचा मृत्यू झाला होता.