वाल्हेकरवाडीतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा; सी.आर.सामाजिक संघटनेची मागणी  

0
1067

चिंचवड, दि. १५ (पीसीबी) – चिंचवड, वाल्हेकरवाडी परिसरात अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सी.आर. सामाजिक संघटनेचे शहर अध्यक्ष संदीप खुंटे, कार्याध्यक्ष आशिष क्षीरसागर यांनी दिला आहे.

याबाबत महापालिका आयुक्त, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनधिकृत बांधकामे करू नयेत, असा राज्य सरकारने आदेश दिला असतानाही सर्रासपणे अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. वाल्हेकरवाडी येथील सर्वे.नंबर.११३, १२३, १२१ या ठिकाणी अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. याकडे अतिक्रमण विभाग सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहे. तरी संबंधित बांधकामावर त्वरीत कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.