मिथिला विकास मंचच्या वतीने विश्रांतवाडीत मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा

0
695

पुणे, दि. १५ (पीसीबी) – मिथिला विकास मंचच्या वतीने विश्रांतवाडी येथे मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बिहारचे प्रसिद्ध तिळाचे लाडू एकमेकांना वाटून सणाचा आनंद लुटला.

भाजपचे आमदार जगदीश मुळीक प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी मंचचे अध्यक्ष मिहीर झा, पिंपरी-चिंचवड शहर भाजप उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष विकास मिश्रा, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष प्रमोद राणा, श्रवण चौधरी, ललित ठाकूर, बालकृष्ण मिश्र, अजय कुमार झा, मनोज झा, मृदुकांत पाठक, शंकर झा, रविंद्र झा, सरोज झा, शैलेंद्र राय उपस्थित होते.

मंचचे अध्यक्ष मिहीर झा यांनी पुणे-दरभंगा रेल्वे रोज सुरू करण्याची मागणी केली. त्यासाठी सह्यांचे अभियानही राबवण्यात आले. त्यामुळे बिहारमधील नागरिकांची ही मागणी पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यावर भाजप आमदार जगदीश मुळीक यांनी या मागणीच्या पूर्णत्वासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.