मोशीतील दगड खाणीतल्या पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू

0
748

मोशी, दि. १५ (पीसीबी) – मोशी येथील दगड खाणीत साचलेल्या पाण्यात मित्रासोबत आंगोळीसाठी गेलेल्या एका तरुणाचा तोल जाऊन पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज (मंगळवार) दुपारच्या सुमारास घडली.

नागेश गाडगी (वय २५, रा. धावडेवस्ती, मोशी. मुळ रा. वजीरनगर, सोलापूर) असे मयत तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारच्या सुमारास नागेश हा त्याच्या काही मित्रासोबत मोशी येथील दगड खाणीत साचलेल्या पाण्यात आंगोळीसाठी गेला होता. त्याला पोहता येत नसल्याने तो किणाऱ्यावरच आंगोळ करत होता. इतक्यात त्याचा तोल जाऊन तो पाण्यात पडल. त्याच्यासोबतच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत तो खोलवर बुडाला होता. घटनेची माहिती नागेशच्या मित्रांनी तातकाळ पोलिस आणि अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन जवानांनी नागेशचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढला आहे. दरम्यान, मुळचा सोलापूरचा असलेला नागेश काही दिवसांपूर्वी कामाच्या शोधात मित्रांकडे धावडेवस्ती येथे रहायला आला होता.