वाकडमध्ये तरुणावर कोयत्याने वार करुन जबर मारहाण

0
1370

वाकड, दि. २१ (पीसीबी) – तिघा जणांनी मिळून एका तरुणावर कोयत्याने वार करुन जबर मारहाण केल्याचे समोर आले आहे. ही घटना सोमवारी (दि.१९) रात्री नऊच्या सुमारास चौधरी पार्क वाकड येथील एका चहाच्या गाडीजवळ घडली.

महेश शहादेव पटेकर (वय २२, रा. म्हातोबानगर, वाकड) असे कोयत्याचे वार होऊन गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, किरण घाडगे, रविंद्र घाडगे आणि अशोक तुपेरे (सर्व रा. म्हातोबानगर, वाकड) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री नऊच्या सुमारास महेश पटेकर हा तरुण चौधरी पार्क वाकड येथील एका चहाच्या गाडीजवळ उभा होता. यावेळी आरोपी किरण घाडगे, रविंद्र घाडगे आणि अशोक तुपेरे हे देखील तेथे आले आणि त्यांची महेश याला शिवीगाळ करुन जबर मारहान करत त्याच्या खांद्यावर कोयत्याने वार केला. या घटनेमध्ये महेश गंभीर जखमी झाला. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. सहायक पोलीस निरीक्षक माने तपास करत आहेत.