वाकडमध्ये आजारपणाला कंटाळून ७९ वर्षीय वृद्धेची आत्महत्या

0
434

वाकड, दि. २५ (पीसीबी) – आजारपणाला कंटाळून एका ७९ वर्षीय वृद्ध महिलेने इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवार (दि.२४) पहाटेच्या सुमारास वाकड येथे घडली.

शालिनी भास्कर गाजरे (वय ७९, रा. वाकड) असे आत्महत्या करणाऱ्या वृद्ध महिलेचे नाव आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शालिनी गाजरे या अनेक दिवसांपासून किडनीच्या आजाराने ग्रस्त होत्या. त्यांच्यावर पुण्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, आजार आणि होणाऱ्या वेदना यामुळे त्या त्रस्त झाल्या होत्या. रविवारी पहाटेच्या सुमारास त्या पाणी पिण्याच्या बहाण्याने घरा बाहेर पडल्या. तसेच राहत्या घराच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती सुरक्षा रक्षकाने संबंधित सोसायटीतील लोकांना दिल्यानंतर घटना समोर आली. या महिलेच्या मागे मुलगा, सुन आणि नातवंड असा परिवार आहे. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.