राधाकृष्ण विखे-पाटलांचे भाजपमध्ये स्वागतच असेल – गिरीश महाजन

0
493

राहुरी, दि. २५ (पीसीबी) – काँग्रेस नेते व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व त्यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास त्यांचे स्वागत असेल.  त्यांच्या प्रवेशामुळे भाजपचा  फायदाच होणार आहे, अशी प्रतिक्रीया जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी  दिली आहे.

तांभेरे (ता. राहुरी) येथील कार्यक्रमानंतर  महाजन पत्रकारांशी बोलत होते.  ते म्हणाले की, लोकसभा उमेदवारीचा निर्णय स्थानिक किंवा राज्य पातळीवर  घेतला जात नाही. विखेंनी भाजपकडे  रीतसर मागणी करावी.   यावर नवी दिल्ली  निर्णय होईल.  राज्यातील अनेक माजी मंत्री भाजपमध्ये आले आहेत. विखे पाटील यांच्या प्रवेशाने भाजपचा फायदाच होईल, असे ते म्हणाले.

दरम्यान,  विखे पाटील यांचे कट्टर समर्थक  सुभाष पाटील  महाजन यांच्या गाडीत बसले. त्यामुळे अनेकांच्या  भुवया उंचावल्या असून विखे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना सुरूवात झाली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीकडून नगरची लोकसभा जागा सोडण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सुजय विखे यांची गोची झाली आहे.