वरिष्ठ पत्रकार रोहित सरदाना यांचं निधन

0
301

नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – वरिष्ठ पत्रकार रोहित सरदाना यांचं निधन झालं आहे. सरदाना यांना आठवड्याभरापूर्वी कोरोना विषाणूची लागण झाली होती. ते 40 वर्षांचे होते.

24 एप्रिल रोजी ट्वीट करून रोहित सरदाना यांनी माहिती दिली होती की, “सीटी स्कॅनमध्ये आढळून आलंय मला कोरोनाची लागण झालीय.”

सरदाना हे सध्या आज तक वृत्तवाहिनीत वृत्तनिवेदक म्हणून कार्यरत होते. आज तक वृत्तवाहिनीवर रोहित सरदाना ‘दंगल’ नावाचा कार्यक्रम करत असत. आज तक वृ्तवाहिनीपूर्वी सरदाना झी न्यूजमध्ये कार्यरत होते.
आपली तब्येत सुधारत असल्याचंही त्यांनी ट्वीट करून सांगितलं होतं. मात्र, 6 दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला.
झी न्यूजचे मुख्य संपादक सुधीर चौधरी यांनी रोहित सरदाना यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांनी याबाबत ट्वीट केलं आहे.