लोहगावमध्ये प्रेमसंबंध तोडण्याची धमकी दिल्याने प्रियकराने केला प्रेयसीचा खून

0
1696

पुणे, दि. २७ (पीसीबी) – प्रेयसीने प्रेमसंबंध तोडण्याची धमकी दिल्याच्या रागातून प्रियकाराने ओढणीच्या सहायाने गळा आवळून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी (दि.२७) लोहगाव येथील फॉरेस्ट पार्क येथून उघडकीस आली.

उमा बबन कापसे (वय १८, रा. राठी, खुळेवाडी, चंदननगर, पुणे) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी तिचे वडिल बबन तुळशीदास कापसे (वय ६४) यांनी विमाननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार परमेश्वर गंगाराम बोयाळे (वय १९, राठी, बोराडेवाडी, चंदननगर, पुणे) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी परमेश्वर आणि मयत उमा यांचे प्रेमसंबंध होते. मात्र तिच्या घरच्यांनी तिची समजूत काढल्याने तिने परमेश्वरसोबत बोलणे सोडून दिले होते. तसेच त्याला संबंध तोडण्याचीही धमकी दिली होती. यादरम्यान कापसे कुटूंबियांनी उमा हिचे लग्न देखील जमवण्यास सुरु केले होते. यामुळे रागाने तळपत असलेल्या आरोपी प्रियकर परमेश्वर यांनी गोड बोलून उमाला  लोहगाव येथील फॉरेस्ट पार्क येथील झाडीत बोलवून घेतले. तसेच तिचा ओढणीच्या सहायाने गळा आवळून खून केला. पोलिसांनी आरोपी प्रियकर परमेश्वर याला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. विमाननगर पोलीस अधिक तपास करत आहेत.