लोकसभा, विधानसभेबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही घ्या – मुख्यमंत्री

0
802

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – ‘एक देश, एक निवडणूक’ ही संकल्पना राबवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मानस आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात आली, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी या धोरणाचा विचार करण्यात यावा. त्याचबरोबर लोकसभा, विधानसभा निवडणुकांबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही एकाच वेळी घेण्यात याव्यात, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात व्यक्त केले आहे.

यावेळी फडणवीस म्हणाले की, निवडणुकीत मोठ्या प्रमाणात होणारा खर्च आणि परिश्रम यामुळे आमच्यासारख्या राजकीय लोकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. प्रत्येक निवडणुकीसाठी नवी रणनिती तयार करावी लागते. एका निवडणुकीचा दुसऱ्या निवडणुकीवर परिणाम होत असतो. त्यासाठी विविध पर्यायातून योग्य पर्याय निवडण्याची आवश्यकता असते.

दरम्यान, शुक्रवारी दिल्लीत भाजप कार्यकर्त्यांची बैठक होती. यावेळी राज्यातील निवडणुकीवर भाष्य करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ही निवडणूक भाजपला शिवसेनेला बरोबर घेऊन लढवणे गरजेचे आहे.