लोकसभा-विधानसभा निवडणूक एकत्र होण्याची शक्यता; एकनाथ खडसे यांचा दावा

0
366

जळगाव, दि. २९ (पीसीबी) – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रितपणे होतील, अशी शक्यता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. त्या दृष्टीने भाजपची तयारी सुरू आहे. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मला आता रुची राहिलेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.