लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार

0
331

हिंजवडी, दि. ३० (पीसीबी) – लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना चिंचवड परिसरात उघडकीस आली आहे. याबाबत मंगळवारी (दि. 29) चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विक्रम भिकाजी गुंजाळ (वय 27, रा. हिंजवडी. मूळ रा. आळे, ता. जुन्नर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित महिलेला गोड बोलून लग्नाचे आमिष दाखवले. त्यातून जून 2018 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत महिलेवर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून बलात्कार केला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.