रिक्षा बाजूला घेतली नाही म्हणून एकाला लोखंडी रॉडने मारहाण

0
314

तळेगाव दाभाडे, दि. १५ (पीसीबी) – रिक्षा बाजूला काढण्याच्या कारणावरून दोघांनी मिळून एकाला पट्ट्याने आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या एका महिलेला देखील दोघा आरोपींनी शिवीगाळ करून धमकी दिली. ही घटना सोमवारी (दि. १४) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास सोमवार पेठ तळेगाव दाभाडे येथे घडली.विजय अनिल शेलार (वय ३५, रा. सोमवार पेठ, तळेगाव दाभाडे) यांनी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सुनील हुलावळे (वय ५०), सुनील चा मुलगा (दोघे रा. सोमवार पेठ, तळेगाव दाभाडे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षा काढण्याच्या कारणावरून फिर्यादी यांच्या घरासमोर येऊन आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ केली. तसेच कमरेच्या पट्ट्याने व लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. त्यात फिर्यादी जखमी झाले. हे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या सुनीला लक्ष्मण शिंदे यांना आरोपींनी शिवीगाळ करून दमदाटी केली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.