”गेल्या पाच वर्षात कुठे किती निधी दिला गेला हे आता मला सांगायला लावू नका”

0
192

मुंबई, दि.१५ (पीसीबी) मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरुन भाजपाने राजकारण केलं. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की करोना काळात आम्ही राजकारण केलं नाही पण मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरुन त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी राजकारण केलं. घाईनं मंदिरं उघडण्याचा निर्णय घेतला असता तर निर्णय घेण्यासाठी एवढी घाई का केली असती असाही प्रश्न विरोधकांनीच आम्हाला विचारला असता. तसंच महाविकास आघाडी सरकारने करोना काळात चांगलं काम केलं नाही हा आरोप चुकीचा आहे. सरकारने आणि जनतेने मिळून चांगलं काम केलं आहे असं अजित पवार यांनी विधानसभेत सांगितलं.त्यामुळे दोन्हीकडून बोलायचं अशी भूमिका विरोधी पक्ष घेत आहे अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

मोदी सरकारने अद्याप सुमारे ३० हजार कोटींचा निधी पाठवलेला नाही. मात्र निधी नाही म्हणून कामं थांबलेली नाहीत, थांबणार नाहीत. गेल्या पाच वर्षात कुठे किती निधी दिला गेला हे आता मला सांगायला लावू नका असं म्हणत अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावला आहे. निसर्ग वादळाचं, अतिवृष्टीचं संकट आपल्या राज्यावर आलं त्यानंतर इथल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्राची टीम पत्रव्यवहार करुनही आली नाही अशीही टीका अजित पवार यांनी केली आहे.