राष्ट्रवादी कॉंग्रेस वेल्फेयर ट्रस्ट वतीने भोसरी येथील भोजापूर सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालयास ग्रंथसांचाची भेट

0
403

भोसरी,दि.१६(पीसीबी) – जेष्ठ नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 80 व्या वाढदिवसानिमीत्त राष्ट्रवादी कॉंग्रेस वेल्फेयर ट्रस्ट वतीने भोसरी येथील भोजापूर सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालयास ग्रंथसांचाची भेट.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय आणि देशातील जेष्ठ नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची वाचन सुस्कृती सर्वांना न्यात आहे. त्यामुळे त्यांच्या 80 व्या वाढदिवसानिमीत्त राष्ट्रवादी कॉंग्रेस वेल्फेयर ट्रस्ट पुणे यांच्या वतीने पुणे जिल्हा व प्रतेक तालुक्यामध्ये पुस्तक वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला, राष्ट्रवादी वेल्फेयर ट्रस्ट च्या वतीने ग्रंथालीच्या निवडणूक पुस्तकांची भोजापूर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय भोसरी यांना 60 पुस्तकाची भेट देणायात आली.

त्यावेळी भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार व भोजापूर सार्वजनिक वाचनालय अध्यक्ष श्री.विलासशेठ लांडे व पिंपरी चिंचवड म्हणगापालिकेचे माजी नगरसेवक श्री.चंद्रकांत वाळके उद्योजक श्री.सुधाकर भोसले, प्राचार्य डॉ.गौतम भोंग,व ग्रंथपाल सौ.वर्षा परतवाघ,इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी भोजापूर सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालयाच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस वेल्फेयर ट्रस्टचे आभार व्येक्त केले.