दोन तुल्यबळ संघ आजपासून गुलाबी कसोटीत आमने सामने

0
335

अ‍ॅडलेड,दि.१६(पीसीबी) – खेळाडूंची तंदुरुस्ती आणि संघ निवडीच्या प्रश्नावर मार करून भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन तुल्यबळ संघ उद्यापासून गुलाबी कसोटीत आमने सामने येतील. खेळाडूंच्या क्षमतेबरोबर सामन्यात वापरण्यात येणाऱ्या गुलाबी चेंडूची देखील कसोटी लागणार आहे.

एकेकाळी माध्यम सम्राट म्हणून गणले गेलेल्या केरी पॅकर्स यांनी १९७० मध्ये दिवस-रात्र कसोटी सामन्याचे स्वप्न पाहिले होते. आज २१च्या दशकात त्या स्वप्नरा खऱ्या अर्थाने मूर्त स्वरुप येऊ लागले आहे. गेल्या काही वर्षांपासून कट्टर प्रतिस्पर्धीमध्ये गणल्या जाऊ लागलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांदरम्यान प्रथमच दिवस-रात्र कसोटी सामना होत असल्याचे या सामन्याचे वेगळेच औत्सुक्य आहे.

या सामन्यापासून भारत ऑस्ट्रेलिया या सांघिक स्पर्धेबरोबरच कोहली-स्मिथ, पुजारा-लाबुशेन, स्टार्क-बुमरा अशी वैयक्तिक स्पर्धा देखील पहायाला मिळणार आहे. पोषक हवामान आणि साथ देणाऱ्या खेळपट्टीवर भारताला इशांत शर्माची उणिव भासेल, तर घरच्या मैदानवर फलंदाजीचा कणा ठरणाऱ्या डेव्हिड वॉर्नरची उणिव ऑस्ट्रेलियाला जाणवेल.

कुकाबुराचा गुलाबी चेंडूचा टणकपणा एरवीच्या लाल चेंडूपेक्षा लवकर कमी होत आहे. त्यामुळे पहिल्या अर्ध्या एक तासात फलंदाजांना, तर नंतर गोलंदाजांना संयम बाळगावा लागणार आहे. कसोटीपूर्वीच्या दोन सराव सामन्यातून भारताने आम्ही आव्हानास सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत