राष्ट्रवादीतर्फे गायक ‘पृथ्वी’चा सन्मान

0
193

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) -शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राष्ट्रवादी अर्बन सेल महिला विभाग अध्यक्षा मनिषा गटकळ आणि सहकारी यांच्याकडून गायन क्षेत्रात 14 वर्ष शास्त्रीय संगीत शिकत अतिशय उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या पृथ्वी(वंडरबॉय)ला सन्मान पत्र देत सन्मानित करण्यात आले.

महापालिकेचे निवृत्त कार्यकारी अभियंता सतीश इंगळे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांना असामान्य जन्मलेला विषेश मुलगा असूनही सामान्यांप्रमाणे घडविले. समाजात एक सकारात्मक संदेश देत घडवलेल्या या रत्नाचा ह्रदयस्पर्शी सन्मान राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या अध्यक्षतेत तसेच माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्वामी समर्थ मंदीर, शिवतेजनगर, चिंचवड येथे संपन्न झाला.

गायन क्षेत्रात 14 वर्ष शास्त्रीय संगीत शिकत अतिशय उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या पृथ्वी(वंडरबॉय) ला सन्मान पत्र देत सन्मानित करण्यात आल. संगीत आणि भक्तिगीत गावून पृथ्वी ने सर्वांची मने जिंकत सर्वांच्याच डोळ्यातून आनंदाश्रु काढले. या दैदिप्यमान सोहळ्यात पृथ्वी व त्यांच्या कुटुंबियाच्या हस्ते स्वामी समर्थ महाराजांची आरती करण्यात आली. त्यानंतर शहराध्यक्ष गव्हाणे व अर्बन सेल महिला अध्यक्षा मनिषा गटकळ आणि सहकारी, इतर सर्व मान्यवर यांच्या हस्ते पृथ्वीला फेटा बांधून औक्षण तसेच शाल, श्रीफळ, सन्मानपत्र देऊन शेकडो भाविकांमध्ये सन्मानित करण्यात आले. पृथ्वीचे कौतुक करताना शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पृथ्वीच्या यशाची दखल घेत. त्याला व्यासपीठ तयार करुन देईल अशी ग्वाही देत त्याच्या सोबत सदैव पाठीशी राहु असा शब्द देत शुभेच्छा दिल्या.

या सन्मान सोहळ्यास युवक अध्यक्ष इम्रान शेख, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, पदवीधर अध्यक्ष माधव पाटील, वाहतूक सेल अध्यक्ष काशीनाथ जगताप, भोसरी उपाध्यक्ष सुनील कदम, शहर सरचिटणीस राजाराम सावंत, शहर सरचिटणीस अशोक मगर, हरिनारायन शेळके, महिला वरिष्ठ कार्याध्यक्षा-कविता खराडे, ओबीसी सेल महिला अध्यक्ष सारिका पवार, अर्बन निरीक्षक मीरा कुदळे, अर्बन शहर समन्वयक-मनिषा जडर, अर्बन शहर समन्वयक बबिता बनसोड, अर्बन शहर समन्वयक संगीता गोडसे, राजू गुणवंत तसेच इतर राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.