राष्ट्रवादीचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात  

0
397

मुंबई, दि. १७ (पीसीबी)- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसलाही  राज्यात मोठे खिंडार पडण्याची  चिन्हे दिसू लागली आहेत. राष्ट्रवादीचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात  असून पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत आहेत. यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे.

माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे, बार्शीचे आमदार दिलीप सोपल आणि उल्हासनगरच्या ज्योती कलानी भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.

कोकणातील  राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे हे देखील शिवसेनेचा भगवा हाती घेण्याची चर्चा आहे. दरम्यान, बीडचे राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर आणि पांडुरंग बरोरा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.