प्राधिकरणातील कचरा संकलन केंद्राला नागरिकांचा विरोध

0
278

प्राधिकरण, दि. २२ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्राधिकरणातील सेक्टर क्रमांक 26 येथे उभारण्यात येणा-या कचरा संकलन केंद्राला नागरिकांचा विरोध आहे. माजी नगरसेवक अमित गावडे यांच्यासह नागरिकांनी आज काम बंद केले.

प्राधिकरणातील सेक्टर क्रमांक 26 येथे कचरा संकलन केंद्र उभारण्याचे महापालिकेने प्रस्तावित केले. परंतु, हे केंद्र दाट लोकवस्तीत उभारले जात असल्याने माजी नगरसेवक अमित गावडे यांनी त्याला विरोध केला. कचरा संकलन केंद्र दुसरीकडे स्थलांतरित करण्याची त्या भागातील नागरिकांची पूर्वीपासूनची मागणी आहे. याबाबत वारंवार पत्रव्यवहार केला. महापालिका आयुक्तांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले. त्यानंतरही प्रशासनाने आज पुन्हा काम सुरु करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर नागरिकांसह तिथे जाऊन पुन्हा एकदा काम तातडीने थांबविण्याच्या सूचना माजी नगरसेवक गावडे यांनी दिल्या.

”कचरा संकलन केंद्राची जागा रिंगरोडची आहे. त्या जागेत महापालिका केंद्र कसे उभारु शकते. आजूबाजूला लोकांची घरे आहेत. लोकांना कच-यांचा वास येईल. रहिवाशी भागात दुर्गंधी पसरेल. त्यामुळे कचरा संकलन केंद्र लोकवस्तीपासून दूर करण्याची आमची आग्रही मागणी असल्याचे” गावडे यांनी सांगितले.