राज ठाकरे यांनी मराठी भाषा दिनाच्या अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा

0
325
मुंबई, दि.२७ (पीसीबी) – आज मराठी भाषा दिन. अनेक दिग्गजांनी सोशल मीडियावरून मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छाही दिल्या परंतु मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठी भाषा दिनाच्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी एका काश्मिरी तरूणीच्या गाण्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. राज ठाकरे यांची पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी ही सदिच्छा !#मायमराठी

Gepostet von Raj Thackeray am Mittwoch, 26. Februar 2020

संत ज्ञानेश्वरांच्या अनेक रचना पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि लतादीदीनी त्या कळसास नेल्या. ह्यातलीच एक रचना शमीम अख्तर ह्या काश्मिरी तरुणीला काश्मिरी वाद्यसाजात गावीशी वाटण, हा कश्मिरीयतने मराठीप्रति दाखवलेला आदर. तो वृद्धिंगत होवो आणि आपल्या राज्याला आपल्या वैभवाची जाणीव करून देवो.Chosen great works of Sant Dyaneshwar were immortalised by Pt Hridaynath Mangeshkar and Lata didi. Shamim Akhtar, a Kashmiri girl chose to render one of them with the infusion of Kashmiri musical instruments. By doing this, she has displayed a high regard for our Marathi ethos.#मायमराठी

Gepostet von Raj Thackeray am Mittwoch, 26. Februar 2020

मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी ही सदिच्छा अशा आशयाची एक पोस्ट सकाळी त्यांनी आपल्या फेसबुक अकांऊंटवरून शेअर केली आहे. त्यानंतर त्यांनी कुसुमाग्रजांचा एक फोटो शेअर करत कविता, नाटक, कथा, कादंबरी, लघुनिबंध असे विविध वाङ्मयप्रकार कौशल्याने हाताळत साहित्याच्या सर्व प्रांतात आपल्या प्रतिभेचा दरारा निर्माण करणारे कुसुमाग्रज हे मराठी साहित्य आणि संस्कृतीचा मानदंडच असं म्हणत त्यांच्या स्मृतीला अभिवादन करणारी एक पोस्ट केली.