“अजूनही मोदीबाबाची थोडी थोडी हवा आहे”

0
412

सोलापूर,दि.२७(पीसीबी) – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी “अजूनही मोदीबाबाची थोडी थोडी हवा आहे. माझ्यासारख्या माणसावर देखील जादू केली होती” असं वक्तव्य केलं आहे.सुशीलकुमार शिंदेच्या उपस्थितीत दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुशीलकुमार शिंदे बोलत होते.

यावेळी बोलताना, मी सुद्धा सुरुवातीची दोन वर्षे म्हणत होतो की मोदी चांगलं काम करतायत. पण देशाची आर्थिक स्थिती बिघडायला लागली, तरुणांना नोकरी देण्याबाबत दिशाभूल व्हायला लागली, जाती- जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असं म्हणत शिंदेंनी मोदींवर निशाणा साधला. शिवसेनेसारख्या पक्षाला आम्ही किमान समान कार्यक्रमात समाविष्ठ करुन महाराष्ट्रात धर्मनिरपेक्ष अर्थात सेक्युलर सरकार आणलं. ही सुरुवात आहे. म्हणून आता जास्त जबाबदारी वाढली आहे, असंही सुशीलकुमार शिंदे म्हटलं आहे.