राज ठाकरे आणि पी.चिदंबरम या दोघांचीही चौकशी प्रश्न निर्माण करणारीच – उर्मिला मातोंडकर

0
463

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – राज ठाकरे आणि पी.चिदंबरम या दोघांचीही चौकशी प्रश्न उपस्थित करण्यासारखीच आहे, असे मत अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी राज ठाकरे आणि पी. चिदंबरम या दोघांनाही पाठिंबा दिला आहे.

सर्वसामान्यांनी या विरोधात आवाज उठवायला हवा. देशात सगळ्यांच्याच बाबतीत असे घडतय. सामान्य व्यक्ती असो किंवा असामान्य सगळ्यांच्या बाबतीत हेच घडते आहे असेही उर्मिला मातोंडकर म्हणाल्या. लोकसभा निवडणुकीच्या वेळी उर्मिला मातोंडकर जेव्हा काँग्रेसच्या तिकिटावर उभ्या राहिल्या होत्या तेव्हा मनसेनेही त्यांना पाठिंबा दिला होता. यामुळेच त्यांनी राज ठाकरे यांची बाजु घेतल्याचे बोलले जात आहे.