भाजपप्रवेश होताच बबन्याचे बबनराव कसे झाले – धनंजय मुंडे

0
439

जिंतूर, दि. २२ (पीसीबी) – राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रादरम्यान विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. माजी मंत्री आणि भाजपचे नेते बबनराव पाचपुते राष्ट्रवादीत असताना भाजपसाठी बबन्या होते. मात्र भाजपप्रवेश होताच ते बबनराव कसे झाले. असा टोला मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. ते जिंतूर येथे बोलत होते.

तसेच भाजपमध्ये असलेले बबनराव पाचपुते जेव्हा राष्ट्रवादीत मंत्री होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचारी असल्याचे आरोप केले. त्यावेळी ते तुमच्यासाठी बबन्या होते. मात्र भाजपमध्ये येताच ते बबनराव झाले. असा खोचक टोला मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला