राज्य मंत्रिमंडळ विस्तारात  रिपब्लिकन पक्षाचे अविनाश महातेकरांना मंत्रिपद – रामदास आठवले

0
823

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवार (दि. १६)  सकाळी ११ वाजता राजभवन येथे होणार आहे. यामध्ये भाजप, शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस अविनाश महातेकर हेदेखील मंत्रिपदाची शपथ घेतील, अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्षातर्फे एक नाव देण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपणास केली होती. त्यानुसार रिपब्लिकन पक्षातर्फे महातेकर यांचे नाव अधिकृतरित्या मुख्यमंत्र्यांकडे पाठविले आहे, असे रामदास आठवले यांनी सांगितले.

या  शपथविधी सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपण उपस्थित राहणार आहे. महायुती सरकार मध्ये रिपब्लिकन पक्षाला  एक मंत्रिपद देण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण  केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभारी आहे, असे आठवले यांनी म्हटले आहे.