राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला रविवारचा मुहूर्त

0
652

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा अखेर मुहूर्त  निघाला आहे. रविवार (दि. १६)  विस्तार होणार असल्याची माहिती   सूत्रांकडून  मिळत आहे.  नव्या विस्तारात शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. मात्र,  शिवसेनेतील अंतर्गत वाद टाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्रिपद घेण्यास नकार दिल्याचे समजते.

लोकसभा निवडणुकीमुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी वांद्रे येथील ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी विस्ताराबाबत चर्चा केली. या चर्चेअंती नव्या विस्तारावर शिक्कामोर्तब करण्यात आले. फडणवीस यांनी त्याबाबत ट्विटही केले होते.   या विस्तारात सेनेकडे उपमुख्यमंत्रिपद आल्यास त्या पदावर कोणाची वर्णी लागणार, हे पाहावे लागणार आहे.

दरम्यान,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यापूर्वी नवनियुक्त केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली होती. त्यानंतर १४ जून रोजी हा विस्तार होईल, अशा  सांगितले जात होत्या. परंतु १४ जूनचा मुहूर्त टळल्यानंतर आता १६ जून रोजी हा विस्तार होण्याची शक्यता   आहे.