राज्यातील विधानसभेसाठीचे उम्मेदवार ज्योतिरादित्य सिंधीया निवडणार

0
649

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या छाननी समितीचे अध्यक्षपद मध्यप्रदेशचे युवा नेते ज्योतिरादित्य सिंधीया यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीच याची घोषणा केली.

विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची नाव निश्चित करण्याचे काम ही समिती करणार आहे. या समितीत सिंधीया यांच्या व्यतिरिक्त मल्लिकार्जुन खर्गे, हरिष चौधरी, मणिक्कम टागोर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, तसेच आमदार के.सी. पडवी यांचा समावेश आहे. विधानसभा निवडणूक समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढविण्यासंदर्भात समिकतीचे मत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासंदर्भातील निर्णयात सिंधीया यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.