देशाभरातील साडेपाच हजार एटीएम सेंटर आणि विविध बँकांच्या सहाशे शाखा बंद

0
803

दिल्ली, दि. २३ (पीसीबी) – सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी गेल्या वर्षभरात देशभरातील साडेपाच हजार एटीएम बंद केली आहेत. तसेच या बँकांनी आपल्या सहाशे शाखांनाही टाळे लावले आहे. खर्चकपात करण्यासाठी बँकांनी हे पाऊल उचलले असून शहरी भागांत डिजिटल व्यवहारांत वाढ झाली असल्याने एटीएमची गरज कमी झाली असल्याचे या बँकांनी म्हटले आहे.

या बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, विजया बँक, देना बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, युनियन बँक आणि अलाहाबाद बँकेचा समावेश आहे. स्टेट बँकेने सर्वाधिक म्हणजे ७६८ एटीएम तसेच, ४२० शाखा बंद केल्या आहेत. बँक ऑफ बडोदाने (विजया व देना बँकेच्या विलीनीकरणानंतर) २७४ एटीएम व ४० शाखा बंद केल्या आहेत. सध्या एटीएमच्या व्यवस्थापनावर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत असल्याने त्यांची संख्या कमी करणे बँकांच्या फायद्याचे ठरणार आहे.