“राज्यपालांना काहीच काम नसतं, काश्मीरमध्ये जे राज्यपाल असतात ते तर नेहमी दारु ढोसत बसतात”

0
572

देश,दि.१६(पीसीबी) – गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी “राज्यपालांना काहीच काम नसतं. काश्मीरमध्ये जे राज्यपाल असतात ते तर नेहमी दारु ढोसत बसतात” असे वादग्रस्त विधान केलं आहे. उत्तर प्रदेशातील बागपत येथे रविवारी एका जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते.

“राज्यपालांना काहीच काम नसतं. काश्मीरमध्ये जे राज्यपाल असतात ते तर नेहमी दारु ढोसत बसतात आणि गोल्फ खेळतात. इतर ठिकाणचे राज्यपाल तर आरामात राहतात कोणत्याही वादात ते पडत नाहीत” असं मलिक म्हणाले आहेत.

दरम्यान, सत्यपाल मलिक हे भाजपाचे माजी नेते असून २०१८-१९ मध्ये जम्मू आणि काश्मीर राज्याचे राज्यपाल होते. सन २०१७ मध्ये मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात मलिक यांच्यावर बिहारच्या राज्यपालपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर त्यांची बदली जम्मू आणि काश्मीरच्या राज्यपालपदी करण्यात आली. दरम्यान, कलम ३७० हटवल्यानंतर मलिक यांना गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्त करण्यात आले.