“कोरोना म्हणजे पाप नाही, बहिष्कार टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार”

0
396

पुणे,दि.१६(पीसीबी) – कोरोना म्हणजे पाप नाही, बहिष्कार टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार, असं विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी सांगितलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यात आतापर्यंत १५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर राज्यात ३२ जणांना कोरोनाबाधित आहेत. ज्या रुग्णांना कोरोना झाला आहे. त्यांना काही सोसायटीमधील लोक बहिष्कृत करत आहे. यावर आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी पुण्यातील सर्व सोसायटींना सूचना केली आहे.

“कोरोनाची लागण म्हणजे पाप नाही. काही सोसायटी त्या कुटुंबावर बहिष्कार करत आहे. हे दुदैव आहे. जर कोणी असे करत असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करणार असे दीपक म्हैसेकर म्हणाले. तसेच ज्या सोसायटीच्या अध्यक्ष आणि सचिव पदमुक्त करण्यात येईल,” असेही ते म्हणाले.

दरम्यान, “पुण्यात गेल्या २४ तासात पाच नवे संशयित रुग्ण आढळले आहेत. यात अजून ५७ संशयित रुग्ण आहेत. यात ३१५ नवीन सॅम्पल आढळले. तर २९४ रिझल्टपैकी १५ वगळता इतर सर्व नेगिटिव्ह आहेत. तर अद्याप २१ जणांचे रिपोर्ट येणं बाकी आहे,” अशी माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली.