राजस्थान सरकार डळमळीतच

0
306

जयपूर, दि. १३ (पीसीबी) : राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडाचं निशाण फडकावल्याने राजकीय परिस्थिती अस्थिर आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज जयपूरमध्ये काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाची बैठक झाली. या बैठकीला 106 आमदार उपस्थित होते. त्यामुळे गहलोत सरकारला तूर्तास दिलासा मिळाला आहे. या बैठकीला गैरहजर राहणाऱ्या सचिन पायलटसह इतर आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. 

जयपूरमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला काँग्रेसचे राजस्थान प्रभारी अविनाश पांडे, राज्यसभा खासदार के सी वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला आणि अजय माकन उपस्थित होते. या बैठकीला 106 आमदार उपस्थित राहिल्याने अशोक गहलोतही सरकारबाबत समाधानी दिसले. यावेळी त्यांनी व्हिक्टरी साईनही दाखवलं.सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सचिन पायलट यांच्या मनधरणीचे प्रयत्न केले होते. दोन दिवसांपासून राहुल गांधी आणि सचिन पायलट यांच्या संपर्क होता. मात्र सचिन पायलट यांची मनधरणी करण्यास राहुल गांधी यांना यश आलं नाही. मात्र आता यामध्ये प्रियांका गांधी यांनी एन्ट्री घेतली आहे. राजस्थानमधील राजकीय संकट दूर करण्याची जबाबदारी प्रियांका गांधी यांनी आपल्या खाद्यांवर घेतल्याचं समजतं.

राजस्थान विधानसभेच्या एकूण 200 जागा आहेत. बहुमतासाठी 101 जागांची आवश्यकता आहे. काँग्रेसकडे 107 आमदार आहेत. तर भाजपकडे 72, इतर आणि अपक्षांचे 21 आमदार आहेत.दरम्यान, अशोक गेरलोत यांचा १०२ आमदारांचा दावा चुकिचा असून इथे २५ आमदार माझ्या सोबत बसले आहेत, असे सचिन पाटलट यांनी नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

काँग्रेसने अशोक गेहलोत सरकार वाचविण्यासाठी सर्व ते प्रयत्न सुरू केले आहेत. अनेक बडे नेते त्यासाठी पायलट यांच्याशी संपर्क करत आहेत. प्रदेश काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे यांनी माध्यमांशी बोलताना, अशोक गेहलोत सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल असा दावा केला आहे.

बंडाचा झेंडा हाती घेतलेले राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरु आहेत. सचिन पायलट यांच्यासाठी सर्व दरवाजे खुले असल्याचं काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. सोबतच भाजपाने कितीही षडयंत्र रचलं तरी राजस्थानमधील सरकार मजबूत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

“कुटुंबात जर कोणी नाराज असेल तर कुटुंबातील इतर सदस्यांसोबत चर्चा करुन त्यावर उपाय शोधला पाहिजे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यातर्फे मी सांगू इच्छितो की, सचिन पायलट आणि इतर कोणत्याही सदस्यांसाठी काँग्रेस पक्षाचे दरवाजे नेहमी खुले आहेत,” अस रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.

माजी केद्रीय मंत्री उमा भारती यांनी राजस्थानमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हेच जबाबजदार असल्याचा आरोप केला. यापूर्वी मध्य प्रदेशमध्ये युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनीही केवेळ राहुल गांधी यांच्यामुळे काँग्रेस सोडल्याचे सांगत, ते युवा कार्यकर्त्यांना मोठे होऊ देत नाहीत, असेही उमा भारती म्हणाल्या.