राजकारण फार काळ टिकत नाही; आम्ही राज ठाकरेंचे आदेश पाळणार – नांदगांवकर

0
439

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे कोहिनूर मील प्रकरणी चौकशीसाठी आज ईडीच्या कार्यालयात हजर राहणार आहेत. या कारवाईमुळे मनसैनिकांत असंतोष आहे. आंदोलनाच्या भूमिकेत असणा-या मनसे नेत्यांची पोलीसांकडून धरपकड सुरू आहे. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीसांनी ही खबरदारी घेतली आहे. तर या यंत्रणांना मी योग्य ती उत्तरे देईनच; तुम्ही टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहन राज ठाकरे यांनी कीर्यकर्त्यांना केले आहे. तर मनसे अधिका-यांनी या चौकशीला राजकीय स्वरूप दिले आहे. राजकारण फार टीकत नाही. बहु भी कभी सास बनती है, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे.

राज ठाकरेंचे सर्व आदेश आम्ही पाळणार आहोत. ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही ईडीच्या चौकशीला शांततेने सामोरे जाऊ. कार्यकर्त्यांचे साहेबांवर प्रेम आहे. कार्यकर्त्यांमध्ये सध्या असंतोष आहे, मात्र त्यांनी संयम बाळगून शांत रहावे, असे बाळा नांदगाकर यांनी म्हटले आहे.