रहाटणीत हेडफोन खरेदीवरुन झालेल्या वादातून दुकानदाराला मारहाण करुन जीवेमारण्याची धमकी

0
473

चिंचवड, दि. ३ (पीसीबी) – मोबाईल साहित्याच्या दुकानातून नवा हेडफोन घेऊन पैसे न देताच निघुन चालेल्या एका ग्राहकाला अडवल्याने. त्या ग्राहकाने दुकानदाराला मारहाण करुन दुकानाची तोडफोड केली. तसेच दुकानातील एका कामगाराला जीवेमारण्याची धमकी दिली. ही घटना रविवारी (दि.२) रात्री साडेसातच्या सुमारास रहाटणीतील चारभुजा मोबाईल शॉपी या दुकानात घडली.  

याप्रकरणी दुकानाचे मालक दिपराम नथाराम राठोड (वय ३४, रा. तलाठी कार्यालयासमोर, चारभुजा मोबाईल शॉपी, रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, महेश सावंत (रा. थेरगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिपराम यांचे रहाटणीत चारभुजा मोबाईल शॉपी नावाचे दुकान आहे. रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास आरोपी महेश हा त्यांच्या दुकानात हेडफोन घेण्यासाठी गेला होता. त्याने हेडफोन घेतला आणि पैसे न देताच निघुन चालला होता. यावर दिपराम यांनी महेशला हटकले. यावर महेशने  दुकानातील पितळची धुपदानी फेकून दिपराम यांना मारली. तसेच हाताने काऊंटरची काच फोडून नकसान केले. तसेच लाथाबुक्क्यांनी त्यांना मारहाण केली. यादरम्यान दुकानातील कामगार भांडण सोडवण्यासाठी आला असता महेशने त्याला देखील हाताने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी महेश याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. वाकड पोलीस तपास करत आहेत.