रहाटणीत तरुणीचा पाठलाग करुन धमकावणाऱ्या तरुणाला अटक

0
1120

चिंचवड, दि. १३ (पीसीबी) – तरुणीचा वारंवार पाठलाग करुन, तु माझे सोबत लग्न नाही केले तर मी तुला कोणाचीच होऊ देणार नाही, अशी धमकी देऊन वारंवार टेक्सट मेसेज आणि व्हॉट्सअॅप नंबरवर अश्लिल मेसेज पाठवून धळ करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे.  ही घटना मंगळवार (दि.४) ते मंगळवार (दि.११) दरम्यान रहाटणीतील शिवराजनगर येथे घडली.

याप्रकरणी पीडित २५ वर्षीय तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, स्वप्निल अजित साळवी (वय २७, रा. रतन गॅस एजन्सीचे बाजुला, शिवराजनगर, रहाटणी) या तरुणाला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वप्निल हा मंगळवार (दि.४) ते मंगळवार (दि.११) दरम्यान पीडित २५ वर्षीय तरुणीचा वारंवार पाठलाग करत होता. त्याने तरुणीला, तु माझ्यासोबत लग्न नाही केले तर मी तुला कोणाचीच होऊ देणार नाही, अशी धमकी दिली. तसेच तिचा मोबाईल नंबर मिळवून त्याने तिच्या मोबाईलवर टेक्स मेसेज आणि व्हॉट्सअॅप नंबरवर अश्लिल मेसेज पाठवून विनयभंग केले. याप्रकरणी तरुणीने बुधवारी (दि.१२) वाकड पोलीसात तक्रार दाखल केली. पोलीसांनी तातडीने आरोपी स्वप्निला याला अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक मोमिन अधिक तपास करत आहेत.