निगडीत अनैसर्गिक कृत्य करुन विवाहितेचा छळ; पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा

0
2536

निगडी, दि. १३ (पीसीबी) – पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य करुन वारंवार माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा लावणाऱ्या पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्या आला आहे. ही घटना २२ जुलै २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ दरम्यान निगडी प्राधिकरणातील सासरच्या घरी घडली.

याप्रकरणी पीडित ४० वर्षीय विवाहितेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती, सासु, दिर, जाऊ या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती हा ४० वर्षीय पत्नीने माहेरहून पैसे आणावेत म्हणून तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य करुन छळ करायचा. तसेच मुलीच्या शिक्षणाचे खोटे नाटक सांगून पीडितेच्या वडिलांकडून वेळोवेळी असे ४ लाख ६३ हजार ३१५ रुपये उकळले. तसेच आणखी पैसे अणण्यासाठी पती आणि सासरकडच्या मंडळींनी तिला शारीरीक आणि मानसिक त्रास दिला. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.