रस्ता ओलांडणाऱ्या भटक्या श्वानाला धडक देऊन कार चालका पसार

0
237

चिंचवड, दि.१९ (पीसीबी) : रस्ता ओलांडणा-या भटक्या श्वानाला धडक देऊन जीवे मारणाऱ्या कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना एम्पायर ईस्टेट, चिंचवड या ठिकाणी घडली.

वंदना अशोक मिश्रा (वय 55, रा एम्पायर ईस्टेट,चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड येथील संत मदर टेरेसा पुलाखालून तीन ते चार भटकी श्वाने रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव आलेल्या एका सफेद कारने त्यातील एका श्वानाला जोराची दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या श्वानाचा मृत्यू झाला. दाखल तक्ररा री नुसार अज्ञात वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरिक्षक दळवी करत आहेत.