शिवसेना नंबर १ चा पक्ष करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची मोर्चेबांधनी

0
265

मुंबई, दि. १९ (पीसीबी) : राज्यातील ग्रामपंचाय निवडणुकांच्या निमित्ताने शिवसेना नंबर १ चा पक्ष व्हावा यासाठी जोरदार प्रयत्न करण्याचे आवाहन स्वतः मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. मुख्यमंत्री स्वतः निवडणुकिसाठी शिवसेनेची रणनीती आखत आहेत. त्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल जिल्हा प्रमुखांशी चर्चा करुन ग्राम पंचायत निवडणुकीत शिवसेनेला नंबर वन करण्याचे आदेश दिले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आज शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत संपर्कप्रमुखांना रणनीती बनवण्याचे आदेश दिले आहे. ‘वर्षा’ बंगल्यावर शिवसेनेची खलबतं सुरु आहेत.

दरम्यान, आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील सर्व शिवसेना संपर्कप्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत येऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणनिती ठरवण्यात आली. शिवसेना महाराष्ट्रातील 14 हजार 234 ग्राम पंचायतींच्या निवडणुका लढवणार आहे. राज्यातील ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होत आहे. तब्बल 34 जिल्ह्यातील 14 हजार 234 गावातील ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. त्यासाठी शिवसेनेनं कंबर कसली आहे. सर्व ग्रामपंचयातीत शिवसेनेनं त्यांच्या संपर्कप्रमुखांना रणनीती आखून सतर्क केलं आहे.

शिवसेना हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला पाहिजे, त्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. सर्वाधिक ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्नशील आहेत. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना त्यांनी पूर्ण ताकद लावण्यास सांगितले.
जिल्हा प्रमुखांची बैठक मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शुक्रवारी शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना मार्गगर्शन केले. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांसाठी जोमाने काम करा, लोकोपयोगी कामं करुन जनतेचा विश्वास संपादन करा, संपर्कमंत्री आणि पालकमंत्र्यांशी समन्वय राखा आणि एकजुटीने निवडणुकांना तोंड द्या, असं यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं.