येरवडा कारागृहात कैद्यांना गांजा पुरवणाऱ्या कारागृहातील शिपायाला रंगेहाथ अटक

0
542

पुणे, दि. २२ (पीसीबी) – येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना जेवणाच्या डब्यातून गांजा पुरवणाऱ्या कारागृहातील शिपायाला कारागृत पोलिसांनी रंगेहाथ पकडले.

विकी सुदाम वसावे (वय ३१) असे अटक करण्यात आलेल्या शिपायाचे नाव आहे. याप्रकरणी, नागनाथ संभू जताप (वय ३७, रा. जेल अधिकारी वसाहत) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारागृहात येणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची गेटवर तपासणी केली जाते. या दरम्यान विकी याची देखील तपासणी करण्यात आली होती. यावेळी त्याच्याकडील पिशवीमध्ये गांजा आढळून आला. पोलिसांनी तो जप्त करुन विकी याला अटक केली आहे.  तसेच विकी विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.