“येणाऱ्या काही दिवसांत शिवसैनिकच संज्या राऊतला धरून मजबूत चोपेल” निलेश राणे यांची संजय राऊत यांच्यावर टीका

0
633

 

 

मुंबई, दि.११ (पीसीबी) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिलं आहे. त्यासाठी शिवसेनेला सोमवारी सायंकाळी साडेसातपर्यंत मुदत देण्यात आली असून, या मुदतीत पक्षाला १४५ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र सादर करावं लागेल. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याच्या तयारीत असून यावरुन सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. रोज पत्रकार परिषद घेऊन भाजपावर टीका करत असल्याने संजय राऊत यांचं नाव सध्या चर्चेत आहे. दरम्यान माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली असून येणाऱ्या दिवसात शिवसैनिकच त्यांना चोपेल असा टोला लगावला आहे.

निलेश राणे यांनी संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत ट्विट केलं आहे की, “मला काल पासून वाटतंय येणाऱ्या काही दिवसांत शिवसैनिकच संज्या राऊतला धरून मजबूत चोपेल”. राणे आणि ठाकरे कुटुंबामधील राजकीय वैर सर्वज्ञात असून दोघेही नेहमीच एकमेरांवर टीका करत असतात.